मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरु : संभाजीराजे

0

मुंबई :  भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज आझाद मैदानात मराठा आंदोलक तरुणांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत लवकरच मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिलं. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा संभाजीराजेंनी यावेळी दिला.

मागील 35 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला आहे. आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग केल्यानंतर दोन तरुणांची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान,  आज छत्रपती संभाजीराजे यांनी  आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांची दुपारी भेट घेतली. आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशाराही त्यांनी दिला. तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दात छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलक तरुणांना आश्वस्त केलं. ‘मराठा तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांचं काही बरंवाईट झाल्यास सरकार जबाबदार असेल’ असं संभाजीराजेंनी ठणकावून सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.