आजपासून घरगुती गॅस सिलिंडर झाले स्वस्त !

0

नवी दिल्ली : विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आजपासून 50 रुपयांनी कमी होणार आहे. त्यामुळे 858 रुपयांना दिल्लीत मिळणारा सिलिंडर आता 805 रुपयांना मिळेल. तर मुंबईत याची किंमत 775.5 रुपये असेल. कोलकात्यात सिलिंडरची किंमत 839 रुपये असेल.

19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत दिल्लीत एक हजार 381 तर मुंबईत एक हजर 331 रुपये असेल. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरचे दर 145 रुपयांनी वाढले. ते 858 रुपयांवर पोहोचले. त्यावेळी गॅसवरील अनुदान दुप्पट करून 291.48 रुपये करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.