मयुरीताई फाऊंडेशनतर्फे गरजु महिलांना गॅस वाटप

0

भुसावळ ,प्रतिनिधी –

येथील मयुरीताई फाऊंडेशन अंतर्गत ज्येष्ठ नागरीक संघातर्पेâ गरीब व गरजू महिलांना गॅस वाटप करण्यात आले.
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जवळील पुजा कॉम्प्लेक्स भागात ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते महिलांना गॅस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक निवृत्ती वामन पाटील हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जय गणेश फाऊंडेशन अंतर्गत जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ अप्पा सोनवणे, सचिव वसंतराव चौधरी, कोषाध्यक्ष शांताराम बोबडे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा मयुरी पाटील, पत्रकार प्रेम परदेशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी मयुरीताई फाऊंडेशनच्या अध्यक्षा मयुरी पाटील यांच्याहस्ते ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरीक व फाऊंडेशनच्या अध्यक्षा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अनिता प्रवीण कोळी, अश्वीनी चावदस पारधी, पाराबाई रमेश सपकाळे, शिलाबाई अनिल सुरवाडे, रिंवूâ प्रविण कोळी, सुशिला अर्जुन कोळी, अनुराधा अनिल कांबळे, संगिता विनोद कोळी, कलाबाई मानसिंग भिल, सुशिला मोहिते, वैशाली सोपान घ्यार, यमुनाबाई आत्माराम कोळी, कमलाबाई सोमा पारधी या गरजू महिलांना मान्यवरांच्याहस्ते गॅस वाटप करण्यात आले.
गरीब व गरजू महिलांच्या अडी अडचणी सोडविल्या जातील तसेच रोजगाराविषयी मार्गदर्शन केले जाईल तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत महिलांना योग्य मार्गदर्शन व सल्ला फाऊंडेशनमार्पâत देण्यात येणार असून इतर बाबतीतही सहकार्य केले जाईल. असे फाऊंडेशनच्या अध्यक्षा मयुरी पाटील यांनी मार्गदर्शनात सांगितले. ज्येष्ठ नागरीक निवृत्ती पाटील, मुरलीधर पाटील, रघुनाथ अप्पा सोनवणे आदींनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रशांत बोदडे, निशा ऑटोचे संचालक मनोज पाटील, दिपाली पाटील, दशरथ सपकाळे, युवराज कोळी, राजु अत्तरदे, अनिल कांबळे यांच्यासह आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास श्रद्धा माळी, सविता अडगावकर, शोभा राणे, सुरेखा पाटील, सुनिता तायडे, राधिका लोहार, अर्चना पाटील, रुपाली पाटील, रेखा पवार, प्रिती सैतवाल, गिता सुरळकर, उषा मावळे, चारुलता अत्तरदे, प्रतिभा धांडे, अर्चना पाटील, मनिषा पाटील, नंदा सोहळे, अनिता पाटील, निर्मला ठावूâर, नर्मदा जाधव, देवाबाई सोनवणे, ललिता लोखंडे, कल्पना सोनवणे, शशिकला पवार, सुमन पाटील, वंदना महाजन, जिजाबाई महाजन, सुमन महाजन, रुपाली लोहार, इंदूबाई लोहार यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.