मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा

0

मुंबई: आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ वा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे. दरम्यान, यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील नेत्यांची नावं जाहीर केली. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विष्णुदास भावे नाटयगृहात मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेटसंबंधी बोलताना सांगितलं की, “महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. कोणालाही आपण मंत्री झालो आहोत असं वाटू नये यासाठी इतक्या जणांना कॅबिनेटमध्ये घेतलं आहे. वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे. पण नुसतेच वाभाडे काढू नका. सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा”.

Leave A Reply

Your email address will not be published.