मनपाच्या स्थायी समिती सभेत सोळा विषय मंजूर

0

जळगाव दि. 11-
शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेत दि. 10 रोजी सोमवारी सकाळी 11 वा. प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुभाष मराठे यांची उपस्थिती होती. या सभेत सोळा प्रशासकीय विषयांना मंजूरी देण्यात आली.
कमी क्षमतेचे 75 नग लोखंडी कचरा कंटेनर खरेदीसाठी 36 लाख 25 हजार निविदा, तर अधिक क्षमतेच्या 25 नग कंटेनर खरेदीसाठी13 लाख 50 हजाराच्या निविदेस मंजूरी देण्यात आली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत प्रभाग क्र. 17 गजानन हौसिंग सोसायटी मेहरुण ओपन स्पेसला चेनलिंग फेन्संग लोखंडी गेट लावणेकामी 7 लाख 29 हजाराच्या संविदेस, नागरी सुविधा योजनेंतर्गत इकबाल कॉलनीत नाल्याला संरक्षण भिंत बांधण्यास 9 लाख 83 हजार 420 च्या संविदेस शहरातील 24 चौकात सिग्नल देखभाल दुरुस्तीसाठी मक्तेदारास 7 लाख 20 हजाराच्या संविदा, प्रभाग क्र. 13 साईबाबा कॉलनी व अष्टभुजा नगरात आरसीसी गटार बांधणेकामी 14 लाख 84 हजार 464 च्या संविदेस मंजुरी देण्यात आली.
अग्निशमनचा निधी पडून
गेल्या सहा वर्षापासून अग्निशमन विभागासाठी आलेला निधी पडून असल्याची तक्रार शिवसेनेचे नितीन बरडे यांनी मांडली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची वसुली होणे गरजेचे असल्याचे सांगून त्याबाबत अडथळे किंवा दबाव असेल तर शिवसेना पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते. आयुक्तांनी मोठ्या घोषणा केल्या मात्र कामात स्पीडब्रेकर लावले जातात, अशी टीका नितीन लढ्ढा यांनी केल्याचे कळते. यावेळी एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान यांनी प्रभागातील कामांसाठी जेसीबीची मागणी केली असता त्यांना जेसीबी नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले होते. हा मुद्दा उपस्थित करुन दोन महिने जेसीबी नादुरुस्त असेल तर उपाययोजना कशा करायच्या असा सवाल त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.