जो विकतो तोच पिकवतो : कृषी संचालक अनिल भोकरेंची दिलखुलास चर्चा

0

जळगाव दि. 11 –
भारत हा कृषी प्रधान देश असून यात जळगाव जिल्हा शेती व्यवसाय करण्यासाठी आघाडीवर आहे.शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी व शेतकर्‍यांना शासनाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाची कामगिरी मोलाची ठरत आहे. शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती लोक लाईव्ह स्टुडीओ मध्ये जळगाव येथील कृषी विभागाचे कृषी संचालक अनिल भोकरे लोकसंवाद कार्यक्रमात दिली. यावेळी लोकशाही समुहाचे संचालक राजेश यावलकर,सल्लागार संपादक धों.ज.गुरव उपस्थित होते.
आई वडिलांकडून मिळाले

शिक्षणासाठी बाळकडू
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबात वावरत असताना आईवडील नेहमी शिक्षणाला महत्व द्यायचे. वडील कृषी सहाय्यक पदावर शेतकर्‍यांची सेवा करीत असल्याने मुलांनी शिक्षण घेऊन स्वतःपेक्षा दुसर्‍यांना उपयोगी पडण्याचा सल्ला देत मुलांनी सैन्यात भरती व्हावे व देशाची सेवा करावी अशी इच्छा होती.यात एक भाऊ वडिलांच्या इच्छेप्रमाणे आर्मीत (छऊ-) मोठ्या पदावर कार्यरत आहे. तर माझे एम.एस.सी. शिक्षण घेत 1987 साली एमपीएससी द्वारे कृषी सेवेत कृषी संचालक म्हणून कार्य करीत आहे. वडिलांची इच्छा आम्ही दोन्ही भावांनी पूर्ण केली असून आम्ही दोन्ही भाऊ देशाची सेवा करीत आहोत. एक देशाची सेवा करीत असून एक भाऊ शेतकर्‍यांची सेवा करीत आहे.त्यावेळी वडिलांकडून मिळालेल्या शिक्षणाच्या बाळकडू मुळे आज आम्ही दोन्ही भाऊ देशाची सेवा करीत आहोत.
जो विकतो तोच पिकवतो
शेतकरी शेतातील माल उत्पादन करीत खाणारांच्या ताटा पर्यंत पोहचवण्याचे कार्य करीत असतो.शेतकर्‍यांच्या सेवेतून देशाची सेवा व्हावी यासाठी एमपीएससी च्या कृषी पदवी परीक्षेतून मराठवाडा,औरंगाबाद,धुळे येथे आदिवासी भागात शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्य केल्याने यातून मोठा अनुभव मिळवला.पुढे पुणे येथे कृषी विभागात सेवा करून जळगाव येथे जिल्हापरिषदेत बाल कुटुंब कल्याण मध्ये काम करण्याची संधी मिळाली. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती वर आधारित असलेल्या कृषी विभागात कृषीसंचालक या पदावर 12 वर्षांपासून कार्यरत आहे.या माध्यमातून शेतकर्‍यांचे उत्पादन वाढीवर भर देत आहे.
शेती समृद्धीचा मार्ग म्हणजे जोडधंदे
जिल्हातील शेतकर्‍यांनी पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता यात बदल करणे गरजेचे ठरले आहे. केळी व कापूस या पलीकडे ज्वारी,बाजरी,हळद आदी पिके पेरणीवरही भर दिला गेला पाहिजे. तसेच केळी पासून विविध प्रक्रिया करून जोड धंदा वाढवला पाहिजे.यासोबतच शेळी पालन,गायी म्हशी पालन,कुकुट पालन यासारखे जोडधंदे करून शेती सोबत यामार्गाने आर्थिक प्रगती साधली जाऊ शकते.
जलव्यवस्थापन काळाची गरज
मागील पाच वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जिल्हातील खेडे हे शेतीवर अवलंबून असल्यानेपाणी वाचवणे जिकरीचे ठरले आहे.यावर कृषीविभागाने सन 2015-16 पासून 650 गावांचे पाण्याचे मूल्यमापन करून जलसंधारण केले आहे.जळगाव जिल्हा ठिबक सिंचन वापरण्यात अव्वल असून यासाठी शासन दरवर्षी 70 ते 75 कोटी रुपये अनुदान देत असते. पाण्याच्या समस्येमुळे केळी पिकाचे क्षेत्र कमी होत आहे.यासाठी तांदलवाडी,रावेर याभागात हळद पिक प्रक्रिया वाढवत असून यासोबतच शीतगृह उभारणीसाठी शासन अनुदान देत आहे. यासोबतच तरुणांनी मशरूम शेती, आळंबी शेती, फुल शेती, मिरची शेती, कुकुम्बर शेती, पॉली हाउस याकडे तरूण शेतकर्‍यांचा कौल वाढलेला दिसतो.
कृषी खात्याकडून विविध शासकीय अनुदान योजना
जळगाव जिल्हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे.जिल्ह्यातील केळी परदेशात जाऊ लागल्याने केळीची निर्यात क्षमता वाढली आहे. शासनाकडून राष्ट्रीय फलोत्पादन योजना,जलयुक्त शिवार अभियान, सूक्ष्म सिंचन अभियान, सेंद्रिय शेती, मृदा नमुने तपासणे, इत्यादी योजना राबविण्यात येत असतात. गट शेती माध्यमातून शेतकर्‍यांनी गट शेती केल्यास यातून शासनाकडून 1 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते यासाठी भडगाव तालुक्यातील 1 गट सुरु झाला असून पुढील काळात सहा गटांचे नियोजन सुरु आहे.
शेतकरी म्हणजे उदयोजक
आजच्या आधुनिक काळात सुटाबुटातील शेतकरी नजरेस पडत आहेत.यात बरेचशे तरून शेतकरी उच्च शिक्षित असून त्यांनी मजूर कमतरता, सालदार,यावर मत करून आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केळी आहे. शासनाने यासाठी 3 वर्षापासून कृषी अभियांत्रिकी योजनेंतर्गत जवळपास 450 ट्रकटर व शेती पूरक अवजारे उपलब्ध करून दिली आहेत.येणार्‍या 5 वर्षात तरून शेतकरी वाढल्याने शेतकरी आत्महत्या प्रमाण बंद होणार असून शिक्षित शेतकरी आल्याने त्यांना शेतातील उत्पन्न विक्री शास्त्र अवगत झाल्याने थेट बाजारात विक्री होऊन जास्त नफा मिळणार आहे.
देव तारी त्याला कोण मारी
नुकतेच जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. या पथकात कृषी संचालक अनिल भोकरे हे देखील होते. पाहणी करून रात्री परत जळगाव मुख्यालयात येत असतांना त्यांच्या सोबत दुर्दैवी अपघात घडला यात एका ट्रक ने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिल्याने वाहन पलटी झाले.परंतु सुदैवाने त्यांना झालेल्या अपघातात साधे खरचटलेही नसल्याने त्यांनी शेतकर्‍यांसाठी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुनर्जन्म झाला असल्याचे त्यांनी लोकशाही स्टुडिओत बोलतांना सांगितले. व या अपघातामुळे अधिक कार्य करण्याची उर्जा मिळाली असून यापुढे समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्य करीत राहणार असल्याचे भोकरे यांनी सांगितले.
शेतकर्‍यांसाठी संदेश
पुण्यवान काम म्हणजे शेती आहे.शेती हि अभिमानाने करण्यासारखी बाब असून शेतकरी हा जगाला अन्न पुरवतो तो जगाचा पोशिंदा आहे.शेतकर्‍यांनी शेतीचे पूर्ण शास्त्र ओळखून ग्राहकांपर्यंत पोहचायला हवेत.शेती पूरक व्यवसाय करून नकारात्मतेला दूर सारून सकारात्मकतेने शेतीकडे बघायला शेतकर्‍यांनी शिकले पाहिजे.शेतापासून थेट लोकांच्या ताटा पर्यंत अन्न कसे पोहचणार यावर शेतकर्‍यांनी विविध संशोधने करून संपूर्ण कुटुंब शेती प्रवाहित केले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.