महाजनांच्या महाजनकीचा दबदबा कायम!

0

शेंदुर्णीत नगराध्यक्षांसह 14 जागा तर धुळ्यात जळगाव पॅटर्न यशस्वी : भाजपाला 50 जागा

जळगांव-दि.11-
विरोधी पक्षांनी ईव्हिममधे फेरफार करून भाजपा निवडणूका जिंकत असल्याचा आरोप करीत आघाडीतील सर्वच विरोधी पक्षांसह स्थानिक नेत्यांनीच नव्हेतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने तर सुरूवातीपासूनच व्हिव्हीपॅटव्दारे मतदानाची मागणी करीत खुद्य स्वपक्षीय परंतु स्थानिक लोकसंग्रामपक्षाचे सर्वेसर्वा आ.अनिल गोटे यांनी ना.महाजनाचे वर्चस्व नाकारून बंड पुकारले होते तरी देखिल जळगांव जिल्ह्यातील शेंदूर्णी नगरपंचायतीत 17 पैकी नगराध्यक्ष पदासह13 तर धुळे मनपाच्या 74 पैकी 50 जागांवर नुकत्याच झालेल्या निवडणूकात विजय प्राप्त करीत प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात भाजपाने यश प्राप्त केले आहे.
शेंदुर्णी नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा 13, राकॉ 3 तर कॉग्रेस 1 जागा मिळाली तर नगराध्यक्ष पदावर भाजपाच्या विजया खलसे यांनी बाजी मारली. शहरातील 9 मतदान केंद्रावरील 22 बुथवर सूमारे 74.19टक्के मतदान सायंकाळ पर्यत मतदारांनी केले होते.
धुळे मनपात आमदार गोटेंची 1 जागा
धुळे महानगरपालिकेत 74 जागांपैकी 50 जागांवर भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवून राकॉ9, सेना 2, कॉग्रेस 5, लोकसंग्राम 1 विरोधकांना धक्का दिला आहे. ना.गिरीश महाजनांसह, ना.सुभाष भामरे, ना. रावल यांना विरोध करून लोकसंग्रामव्दारे स्वतंत्र चूल मांडत मनपा निवडणूकीत भाजपाच्या नेतृत्वालाच आव्हान दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.