मंगलप्रभात लोढांना धक्का ; मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची शक्यता

0

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी लागल्यानंतर मुंबई प्रदेशाध्यक्षपदीही नव्या नियुक्तीची चिन्हं आहेत. मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपदावरुन आमदार मंगलप्रभात लोढा यांची गच्छंती होण्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची बैठक बोलावली असून भाजप मुंबई प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचं नाव चर्चेत आहे.

संध्याकाळी सहा वाजता प्रदेश कार्यालयात मुंबईतील आमदार, नगरसेवकांना पाचारण करण्यात आलं आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. या बैठकीत ‘मुंबई भाजप’ला नवे प्रदेशाध्यक्ष मिळू शकतात. मुंबई अध्यक्षपदासाठी आशिष शेलारांसोबत अतुल भातखळकर, पराग आळवणी यांचीही नावं चर्चेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.