भोले महाकाल फांउडेनतर्फे आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

0

बोदवड (प्रतिनिधी) :- शहरात कोरोना विषाणूने शिरकाव केला असून बाधित रुग्णांची संख्या १५ वर पोहचली आहे.या विषाणूला हरविण्यासाठी तथा आटोक्यात आणण्यासाठी आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या मान्यतेनूसार रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप सामाजिक भान ठेवून भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे तालुक्यातील विविध गावांसह शहरात करण्यात आल्या असून घरातचं रहा,सुरक्षित रहा,वारंवार हात साबणाने धुत रहा,कामानिमित्त घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल अथवा मास्क बांधावे असे आवाहन सुध्दा फांऊडेशन तर्फे यावेळी करण्यात आले.

गोळ्यांचे वाटप करतांना भोले महाकाल मल्टीपर्पस फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गंगतिरे,फाउंडेशचे पदाधिकारी गजानन खोडके,फांउडेशनचे सदस्य गोपाल पवार,आकाश फाटे, आनंद खोडके, अक्षय फाटे यांचेसह तालुक्यातील मनूर बुद्रुकचे सागर कुकडे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.