जामनेर तालुक्यात कोरोना बाधितांनी केली शंभरी पार

0

जामनेर (प्रतिनिधी) :–  दि.१८ रोजी शहरात चार तर ग्रामीण भागात एक कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने शहरात ७७ तर ग्रामीण भागात २६ अशी तालुकाभरात एकूण १०३ रुग्ण झाल्याने तालुक्यात कोरोना बाधीतांनी शंभरी पार केल्याने प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

एकशे तीन रुग्णापैकी शहरातील ३४ तर ग्रामीण भागातील ५ असे एकूण ३९ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परत आले असून १० रुग्ण मृत्यू पावलेले आहे.शहरातील ३९ तर ग्रामीण भागातील १५ असे एकूण ५४ रुग्ण शहरासह जळगाव येथे उपचारा खाली असून प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष उपक्रमाव्दारे डॉ.प्रफुल्ल धांडे,डॉ.यशवंत पाटील,डॉ.महेंद्र पवार आदि मोफत होमिओपॅथी उपचार करीत आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे व नोडल ऑफिसर डॉ.विनय सोनवणे यांनी जळगांव येथून मनोविकार मार्गदर्शक यांचे विशेष पथक बोलवून कोरोना बाधितांचे समुपदेशन व मार्गदर्शक करीत आहेत.

कोरोना बाधीत रुग्णावर जामनेरात प्रथमच अत्यंसंस्कार – शहरातील ६५ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णावर साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.दि.१७ रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आज दि.१८ रोजी जामनेर येथील स्मशानभूमीत नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी राहुल पाटील व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंसंस्कार करण्यात आल्याची माहिती डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.