भोकरबारी येथे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते नाला खोलीकरणाचा शुभारंभ

0

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर मतदारसंघातील  भोकरबारी (ता.पारोळा) येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) अंतर्गत नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील, सरपंच राहुल पाटील, उपसरपंच सौ.पूनम विश्वास गव्हाणे उपस्थित होते.

उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर दादाराव जाधव, तालुका कृषी अधिकारी वारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक प्रवीण ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी बी.के.बोरसे, कृषी सहाय्यक निलेश पाटील, कृषी सहाय्यक खरात, शेतकरी अरुण पाटील, संजय पाटील व इतर ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

या योजनेमुळे परिसरातील विहीरीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.