भुसावळ शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूचे थैमान

0

50 पेक्षा अधिक रुग्ण दवाखान्यात दाखल

प्रशासनात खळबळ ; पथकाकड़ून  रुग्णासह कुटुंब व परिसरात तपासणी 

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहरासह ग्रामीण भागात डेंग्यू सदृश्य आजाराने  थैमान घातल्याचा धक्कादायक  प्रकार समोर आला आहे .  शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयात अनेक रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत तर बरेच रुग्ण ईलाजा नंतर डिस्चार्ज घेवून घरी रवाना झाले असल्याची माहिती संबंधित हॉस्पिटल मधील डॉक्टर्स यांनी  दिली.सुमारे 50 पेक्षा अधिक रुग्ण खाजगी  दवाखान्यासह शासकीय रुग्णालयात उपचारार्थ  दाखल असल्याचे वृत्त आहे . अचानक  डेंग्यू सारख्या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .तर प्रशासनात खळबळ उडाली आहे .

गेल्या आठवडयापासुन शहरासह 6ग्रामीण भागात सुरु असलेल्या पावसामुळे सर्वत्र  चिखल व घाणीचे  साम्राज्य पसरले आहे. त्यात शहराला होणारा पाणीपुरवठा चक्क 8 ते 15 दिवसानंतर होत असतो यामुळे नागरिकांना  पाण्याची साठवण करावी लागते व याच दूषित  पाण्यामुळे  नागरिकांना डेंग्यू झाला असल्याची शक्यता डॉ पंकज राणे व्यक्त केली आहे. या सर्व दूषित व संसर्गजन्य आजाराला अनुकूल अशीच परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे. यात शहरातील शनि मंदिर वार्ड, श्रीनगर , सिंधी कॉलनी व अन्य भागातीलरुग्णासह ग्रामीण भागातील रुग्णाचा यात समावेश आहे.

दरम्यान अचानक उद्भवलेल्या या परिस्थितिने प्रशासनाची खळबळ उडाली उडाली  असून  अधिकारी खड़बडून जागे झाले आहे. पालिका प्रशासनाने  डेंग्यू झालेल्या रुग्नांच्या घरातील पाण्याचे , कुटुंबातील अन्य रुग्नांचे व परिसरातील नागरिकांच्या रक्ताचे व पाण्याचे नमुमे तापसणी करिता  घेतले आहे.

डेंग्यूहसंसर्गजन्य आजार असून या रुग्णाच्या सान्निध्यात येणाऱ्या अन्य इसमास वा व्यक्तीला होवू शकतो . याकरीता नागरिकांनी खबरदारी घ्यावी .पाणी साठा उघडा ठेवू नये , पाणी गाळून व उकळून प्यावे . स्वछता राखावी,घर व परिसरात पाण्याचे डबके होऊ देवू नये , ताप, डोकेदुखी,चक्कर येणे पुरळ येणे आदी लक्षणे आढळून येतात ज्या रुग्णात ही लक्षणे आढळल्यास रुग्नास त्वरित दवाखान्यात  न्यावे.आदी काळजी घ्यावी असेही डॉ पंकज राणे यानी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.