दिवाळीनिमित्त भुसावळची बाजारपेठ सजली ; मात्र पावसामुळे ग्राहकांनी फिरवली पाठ !

0

भुसावळ (प्रतिनिधी)- दिपोत्सव अर्थात दिवाळी सण ,घराघरात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात येतो यानिमित्त अबालवृद्धा पासून सर्वच नवनवीन कपडे ,स्वादिष्ट व चमचमीत फराळ, शेव , लाडू, चिवडा, अनारसे, चकली , रंगीबेरंगी रांगोळ्या,  आकाशकंदील, विद्युत रोषणाई , यासह आकर्षक सजावटी करिता विविध आकारातील पणती, सुगंधी उटणे , लक्ष्मी मूर्ती यासह अनेक  घर सजावटीचे साहित्य बाजारपेठेत विक्रिस आले आहेत .

बाजारपेठ तोरनांसह ,मेहंदी, आकर्षक रांगोळी पुस्तके , अशा साहित्याने सजली आहे.अवघ्या दोन ते तीन दिवसांपासून दिवाळी उत्सव सुरु होत आहे  .  व्यापारी वर्ग दुकाने थाटुन ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे . मात्र गेल्या 4 दिवसांपासून संततधार सुरु असलेल्या या परतीच्या पावसाचा बाजारपेठेवर चांगलाच परिणाम झालेला दिसून येत आहे . पावसाचे बाजारपेठेवर सावट आल्याचे दिसून येत आहे . ग्राहकांनी जणू बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे .पावसाच्या रीप रिप मुळे बाजार पेठेत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे . यंदाची दिवाळी पावसातच साजरी करावी लागते की काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे .पावसामुळे  हवेत गारठा पसरला आहे यामुळे थंडितही वाढ झाली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.