भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मॉर्डन रोडवरील मोबाईल शॉप व जनरल स्टोअर्स रात्रीच्या ९ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस पत्रा कापून आत प्रवेश करून अंदाजे ४० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आल्याने त्या भागातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
२८ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मॉर्डन रोडवरील पाटील एंटरप्रायजेस मोबाईल शॉपी चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून दुकान मालकाच्या संमती वाचून अनधिकृत आत प्रवेश करून रात्रीच्या वेळेस मॉर्डन रोडवरील पाटील एंटरप्रायजेस मोबाईल शॉपी मधून ५०० रुपयांची चील्लर, ८ ते १० रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल,त्यात दोन महागडे मोबाईल,४ मेमरिकार्ड,३ पॅनड्राव्ह ,५० हेडफोन,१० चार्जर,२ मार्ट वॉच तर हरी सत्यनारायण रेडिमेड अँड जनरल स्टोअर्स मधून १५ हजार रुपये रोख ,५ हजार रुपयांची चिल्लर,लहान मुलांचे कपडे असे अंदाजे २५ हजार रुपये असा एकूण ४० हजार रुपयांची रक्कम व मुद्देमाल लांबविला.
पोलीस प्रशासनाने काही दिवसांपूर्वी व्यापारी पोलिस मित्र अभियान या संकल्पने अंतर्गत व्यापाऱ्यांना शहरातील गस्त करण्यासाठी आपल्यासोबत सहभागी केले आहे व्यापारी पोलीस मित्राचे काम करीत आहे तरीही चोरट्यांनी पोलीस व व्यापारी पोलिस मित्राचे हातावर तुरी देत चोरी करण्याचे धाडस केले आहे . रात्रीची गस्त वाढवून सुद्धा शहरात चोरी होतच आहे. पोलीस प्रशासनाने रात्रिची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.