भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योगदिवस ऑनलाइन पद्धतीने उत्साहात साजरा

0

भुसावळ (प्रतिनिधी) : – रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आजची परिस्थीती लक्षात घेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने
सकाळी सात वाजता योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता डी आर एम, मनोजकुमार सिन्हा ए डी आर एम , सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच परिवारातील सदस्य यांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभाग नोंदविला. आणि योग साधना घरूनच केली. ह्या ऑनलाईन योग सत्रा मध्ये योग साधनेचे प्रात्यक्षिक एन पी परदेशी योग शिक्षक यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कुळकर्णी, प्राचार्य रेल्वे स्कूल आणि संतोष उपाध्याय ग्रंथपाल रेल्वे स्कूल यांनी केले. त्यात प्रत्येक आसनाची माहिती आणि लाभ याची माहिती विषद केली.
या कार्यक्रमासाठी स्वाती चतुर्वेदी उप प्राचार्य रेल्वे स्कूल, आर पी जावळे कला शिक्षक रेल्वे स्कूल , शिक्षकेतर कर्मचारी, देवेंद्र विश्वकर्मा डी बी ए आणि त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एन डी गांगुर्डे सिनी डी पी ओ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्मिक शाखा भुसावळ येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.