भुसावळ येथे पर्समधून दोन अज्ञात महिलांनी ब्रेसलेट लांबविले

0

भुसावळ : तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या पर्समधून हात चलाकीने तीस हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट काढून दोबारा केल्याचा प्रकार शहरात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपनगर येथील रहिवासी दर्शना अभय कोठारी या भुसावळ शहरातील रविवारी आठवडे बाजार असल्याने एक वाजेच्या सुमारास सराफ बाजारातील एका आयुर्वेदिक दुकानात औषधी खरेदीसाठी आले असता त्यांच्या मागून आलेल्या कार बांधलेल्या दोन महिलांनी घाई गर्दी करीत औषधी देण्याची मागणी केली. दरम्यान दोघी महिलांनी दर्शना यांच्या पर्स मधील सात ग्रॅम वजनाचे तीस हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट अलगदरीत्या काढून उभारा केला. हा प्रकार लक्षात येतात दर्शना कोठारी यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठून दोन अनोळखी महिलांविरुद्ध फिर्यादी यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दाेन्ही चाेरी करणाऱ्या महिला दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. याप्रकरणी  डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील हे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.