भुसावळ कारागृहात दावत-ए-इस्लामी तर्फे मार्गदर्शन

0

  भुसावळ | प्रतिनिधी 
येथील उप जिल्‍हा कारागृहात  दावत ए-इस्लामी तर्फे रमजान महिन्यानिमित्त कारागृहात बंदीस्‍त असलेल्या कैद्यांना चांगल्या मार्गावर लावण्याच्या उद्देशाने प्रमुख वक्ते सलीम मुबलीग यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.        यावेळी कारागृह अधीक्षक एम.के.खिरगे यांना दावत ए इस्लामी तर्फे मराठी भाषेत कुराणाची प्रत भेट देण्यात आली.याप्रसंगी नायब तहसीलदार एस.बी.सपकाळे, हाजी ताहेर खान, माजी नगरसेवक हाजी साबीर शेख,जुबेर मुबलीक, रफिक रोशन,युनुस अली आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.