मध्य रेल्‍वेतर्फे उन्हाळी सुट्टयानिमीत्‍त विशेष गाड्‍या धावणार!

0

भुसावळ | प्रतिनिधी 

मध्य रेल्‍वेने उन्हाळी सुट्ट्या निमित्त रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विविध मार्गांवर साप्ताहिक विशेष गाड्‍या चालविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे एका प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे.

यात  मुंबई – नागपुर विशेष गाडी  क्रमांक ०२०२१ साप्ताहिक विशेष मुंबई येथून दर रविवारी ३० जुन पर्यंत सकाळी ११-३० वाजता  सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे २-४० वाजता नागपूर येथे पहोचेल. तर गाड़ी क्रमांक ०१०७४ ही साप्ताहिक विशेष नागपुर येथून दल सोमवारी  दि.१ जुलैपर्यंत सकाळी ६-५० वाजता सुटून रात्री ११-२५ वाजता  मुंबई येथे पोहोचणार आहे.  सदर गाड्‍या या मार्गावरील दादर ,ठाणे ,कल्याण ,इगतपुरी ,नाशिकरोड, जळगाव भुसावळ ,अकोला ,बडनेरा, धामणगाव,वर्धा या स्थानकांवर थांबणार आहे.  मुंबई ते नागपूर  विशेष गाडी  क्रमांक ०१०७५ साप्ताहिक विशेष मुंबई येथून दर मंगळवारी  दिंनाक २ जुलै पर्यंत रात्री १२-२०   वाजता सुटून  दुसऱ्या दिवशी दुपारी २-३० वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे. गाड़ी क्रमांक ०१०७६ साप्ताहिक विशेष नागपुर येथून दर मंगळवारी २ जुलैपर्यंत दुपारी चार वाजता सुटून सकाळी ८-२० वाजता मुंबई येथे पोहोचेल.  सदर गाड्‍या दादर ,कल्याण ,इगतपुरी ,नाशिक रोड ,मनमाड, भुसावळ ,मलकापुर, शेगांव ,अकोला ,मुर्तिजापुर ,बडनेरा , चांदुर , धामणगाव ,वर्धा या   स्थानकावर थांबा घेणार आहे.  तर पुणे – काझीपेठ विशेष गाड़िया (५ फेऱ्या ) गाड़ी क्रमांक ०२१५१ साप्ताहिक विशेष पुणे  येथून दर सोमवारी दि.३ जुन,१० जुन व १७ जुनला रात्री ९-३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६-३५ वाजता  काझीपेठ येथे पहोचेल. गाड़ी क्रमांक ०२१५२ साप्ताहिक विशेष काझीपेठ येथून   दर मंगळवारी दि.२८ मे,४ जुन,११ जुन व १८ जुन पर्यंत सायंकाळी ७ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५-४० वाजता पुणे येथे पहोचेल.या गाड्‍याला  पुणे,दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ,शेगाव, अकोला,बडनेरा,धामणगाव, पुलगांव,वर्धा,वरोरा,  द्रपुर,बल्लारशाह,शिरपुर, काघजनगर,रामागुंदम, पेधापल्ली,काझीपेठ या स्थानकांवर थांबा घेणार आहे.  पुणे –जबलपुर विशेष  गाड़ी क्रमांक ०१६५६ साप्ताहिक विशेष गाड़ी जबलपुर येथून दर सोमवारी दि.२४ जून पर्यंत सकाळी ७-४५ वाजता निघून  दुसऱ्या दिवशी पहाटे ४-०५ वाजता पुणे पहोचेल. गाड़ी क्रमांक ०१६५५ साप्ताहिक विशेष गाड़ी पुणे येथून दर  मंगळवारी दि.२५ जुन पर्यंत सकाळी ७-४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता जबलपुर  पहोचेल.  सदर गाड्‍या दौड़,अहमदनगर , कोपरगाव ,मनमाड ,भुसावळ ,खंडवा ,छनेरा ,खिरकिया ,हरदा ,ईटारसी ,पिपरिया ,गाडरवारा,करेली,नरसिंगपुर,श्रीधाम,मदनमहल या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.