भुसावळात ६४ मास्क न वापरणाऱ्यां नागरिकांविरुद्ध कारवाई

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर शहरात मास्क न वापरणाऱ्यां ६४ लोकांवर पोलिस व नगरपरिषद प्रशासनाच्या पथकाने २८ रोजी दंडात्मक कारवाई केली .सदर कारवाई सुरुच राहणार असून नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पथकाने केले आहे

ही कारवाई नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी संदीप चीद्रवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे , पोलीस निरीक्षक अर्चित चांडक , पोलीस निरीक्षक बाबासाहेब  ठोंबे  यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल विशाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील संजय भदने, पालिका कर्मचारी सचिन नारखेडे ,राजेश पाटील, किशोर जंगले, सुनील शेकोकरे, सतीश बेदरकार ,इकबाल शेख, नगीण सोनार आदिनी केली .

Leave A Reply

Your email address will not be published.