भुसावळ तालुका पोलिसांनी दोन दिवसात दिड लाखांची गावठी दारू नष्ट –

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी  पुन्हा अवैधरीत्या गावठी दारू हातभट्टी चालकांविरुद्ध मोहिम उघडल्याने अवैध धंदे चालकात खळबळ उडाली आहे .

गेल्या दोन दिवसात सुमारे दिड लाख रुपये किंमतीचे गावठी दारूचे रसायन नष्ट करण्यात आल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी संशयीत शाहरूख शेखलाल गवळी शिवपूर कन्हाळा याच्याकडे दोन हजार ९०० लीटर गुळ मोह नवसागर मिश्रीत कच्चे रसायन व १०५ गावठी तयार दारू मिळून एक लाख पाच हजार ७५० रुपयांचे रसायन नष्ट करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सलग दुसर्‍या दिवशीही कारवाई

रविवारी देखील तालुका पोलिसांनपी किन्ही शिवारातील नाल्याच्या काठावर  धाड टाकत इब्राहीम रन्नु गवळी शिवपूर कन्हाळा यास गावठी हातभट्टीची दारू गाळताना आढळल्याने पोलिसांनी सात ड्रममधील एक हजार ३०० लिटर रसायन तसेच ८० लिटर दारू मिळून ४९ हजार ७०० रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, विनोद पाटील,  गणेश राठोड ,जगदीश भोई, शिवाजी खंडारे, रीयाज काझी तसेच विठ्ठल फुसे, युनूस शेख, गणेश राठोड,  अविनाश टहकले व सुनील चौधरी आदींच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.