भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडेंनी स्व-खर्चाने सीमा केल्या सील

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक १८ च्या नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचशील नगर येथे पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर गंगाराम प्लॉट, कोलते गल्ली व भवानी पेठ भागातील सीमा स्वखर्चाने सील केल्या आहेत. गंगाराम प्लॉटमध्ये जाण्या-येण्यासाठी आता अष्टभुजा देवी मंदिरा पासून एकच मार्ग असून अतिआवश्यक सेवेसाठी त्याचा वापर केला जाणार आहे तर नागरीकांना आता १४ दिवस घरातच कॉरंटाईन करण्यात आले आहे.

शहरातील समता नगर, पंचशील नगर व सिंधी कॉलनी परीसरानंतर शांती नगर भागातील डॉक्टरांचा कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमीवर हा परीसर प्रशासनाने सील केला होता तर जामनेर रोडवरील गंगाराम प्लॉट, भवानी पेठ , कोलते कॉलनी परीसरातील सीमा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रशासनाशी केलेल्या चर्चेनंतर स्वखर्चातून सील केल्या आहेत. या परीसरात आता तीन शिष्टमध्ये स्वयंसेवक धांडे यांनी नेमले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.