जळगाव कोविड रुग्णालयात रुग्ण सुविधांपासून वंचित -ऍड.राजेश झाल्टे

0

जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांना आवश्यक त्या सेवा मिळत असल्याचे समोर आले आहे.याठिकाणी रुग्णांना आरोग्य विभागाच्या गाईडलाईन प्रमाणे कुठलीच सुविधा मिळत नसून टॉयलेट, बाथरूम सुद्धा अतिशय घाणेरडं असल्याने कोविड रुग्णालयाचे पितळ उघडे पडले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे तक्रार करून रुग्णालयातील घाणीचे काही व्हिडीओ देखील ऍड.राजेश झाल्टे यांनी दिले आहेत.

याबाबत कालच खासदार उन्मेष पाटील यांना कालच माहिती दिली होती. त्यावर खासदार उन्मेष पाटील यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय व आरोग्यमंत्री यांना या परिस्थिती बाबत माहिती देऊन तसे पत्र देखील दिले आहे.

जळगाव कोविड रुग्णालयात सुविधेचा वाणवा

जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल ला प्रशासनाने कोविड रुग्णालयात रूपांतर केले मात्र नुसते नाव रूपांतरीत करून सुविधा उपलब्ध करून दिलेल्या दिसून येत नाही.याठिकाणी फाटलेल्या गाद्या, घाणेरडे बेडशीट, अस्वछ घाणेरडे बाथरूम, टॉयलेट, अस्वछ वॉर्ड,अंघोळीला गरम पाणी उपलब्ध नाही, पिण्या करिता स्वच्छ व गरम पाणी नाही यामुळे कोविड रुग्णालयात सुविधेचा वाणवा आहे.कोविड रुग्णांना याठिकाणी आयुष मंत्रालयाच्या गाईड लाईन नुसार कुठलीही सुविधा दिली जात नाही यामुळे रुग्णांची कुचंबणा होत आहे.

राज्य भरात अनेक जिल्ह्यात अशीच परिस्थिती

मालेगाव येथे माझे नातेवाईक(दाजी) डॉ. बीके त्रिभुवन वैद्यकीय अधिकारी हे गेल्या अनेक वर्षा पासून येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत आहे. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती मध्ये त्यांनी सेवा देतांना कोविड पॉझिटिव्ह झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर एक अप्रिय अनुभव मिळाला त्यात स्वच्छता, असुरक्षित खोल्या, पोषक आहार, टॅब कोल्ड वॉटरमध्ये बाथरूममध्ये थंड पाण्याने अंघोळ, पिण्या करिता गरम पाणी नाही, असा वाईट अनुभव ते सध्या मालेगाव येथील रुग्णालयात अनुभवत आहे.

जळगाव कोविड रुग्णालयात जिल्हा प्रशासनाने सेवा,सुविधा उपलब्ध करून न दिल्यास मे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे असे ऍड. राजेश झाल्टे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वय कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.