अंतर्नादचा धुणी-भांडी करणाऱ्या महिला मजुरांना ‘एक हात मदतीचा

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या वतीने लाॅकडाऊन काळात पहिल्या टप्यात ८० कुटुंबांना आठवडाभर पुरेल असा किराणा वाटप करण्यात आला.दुसऱ्या टप्यात अजून १०० कुटुंबाना मदत करण्यात येणार आहे.

‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत अंतर्नाद प्रतिष्ठानने स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनात गरजूंची भूक भागवण्याचा प्रयत्न केला. वरणगाव राेडवरील लाल जैन मंदिर परिसर (११ कुटुंब), कंडारी विटभट्टीवरील कामगार (१२ कुटुंब), मामाजी टाॅकीज परिसरात धुणीभांडी करणाऱ्या वृद्ध विधवा ( ७ कुटुंब), हातमजूर, अाचारी, हाॅस्पिटल वाॅचमन, बिल्डिंग काॅन्ट्रॅक्टरकडे असलेले परराज्यातील मजूर, मंदिर पुजारी, दुकान कामगार (१० कुटंुब), दुसखेडा (ता. यावल) झाेपडपट्टी रेल्वेलाइनच्या अलिकडील (२२ कुटुंब), रेल्वे लाइनच्या पलिकडील (११ कुटुंब), भुसावळात धुणी-भांडी करणारे व परराज्यातील मजूर (७ कुटुंब) अशा ८० कुटुंबांना पहिल्या टप्यात शिधा वाटप करण्यात अाला. त्यात ४ किलाे गहू, २ किलाे तांदुळ, अर्धा किलाे तूरडाळ, १ किलाे तेल, चटणीची दाेन पाकिटे, १ साबण असे जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात अाले. प्रतिष्ठानचे पदाधिकारी व उपक्रमासाठी नियुक्त करण्यात अालेल्या समिती सदस्यांनी गरजूंच्या घरापर्यंत जावून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.

लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांनीही केली मदत
लॉकडाउनच्या काळात शहरीभागातील शाळांमध्ये शासनातर्फे तांदूळ वितरीत करण्यात आला.मध्यमवर्गीय व सधन कुटूंबातील पालकांनी या उपक्रमासाठी ११५ किलो तांदूळ दिलासेंट अलायसेस स्कुल समोर अंतर्नादच्या स्वयसेवकानी ही मदत स्विकारली.दुसऱ्या टप्यात हा तांदूळ आणि शिधा प्यॉकेट गरजूंना वितरीत केले जाणार आहे.

हे आहेत दातृत्वाचे धनी
अंतर्नादच्या या उपक्रमाला माजी खासदार हरिभाऊ जावळे, अवधूत साठे, सागर माेहरील, वंदना भिरुड, विजय देवरे, संदीप राजपूत, ललित पाटील, किशाेर पाटील, अाबिद शेख, चिरागसेठ, रमेश सरकटे, सुनील धांडे, रंजीतकाैर धारीवाल, दीपक चाैधरी, दीपाली खर्चे, राजेंद्र जावळे, अलका देवगिरीकर, नीलेश वारके, स्मिता भाेळे, मयुर इंगळे, जिजाबाई जंजाळे, श्रीकांत माेटे, भूषण चाैधरी, शैलेंद्र वास्कर, रियाज तडवी, समाधान मुऱ्हे, परेश सपकाळे, क्रांती सुरवाडे, अनिल देशपांडे, पांडुरंग महाजन, विद्या सपकाळे, शरद हिवरे, सीमा न्हायदे, अमाेल जावळे, रवी पाटील या दात्यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.