भुसावळात प्रभाग 18 मध्ये फवारणी : राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे यांचा उपक्रम

0

भुसावळ  (प्रतिनिधी)-  भुसावळ प्रभाग 18 च्या नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रभागातील नागरीकांच्या आरोग्याची काळती घेत बुधवारी प्रभागातील गंगाराम प्लॉट परीसरात दिवसभर फवारणी केल्यानंतर नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरीकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. कोरोनाचा विषाणू संसर्गजन्य असल्याने नागरीकांच्या बसण्याची ठिकाणी, दरवाजे, गेट तसेच वारंवार स्पर्श होत असलेल्या ठिकाणी फवारणी केली जात असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

नाल्यांच्या सफाईने समाधान

शहराध्यक्ष नितीन धांडे म्हणाले की, नागरीकांच्या सेवेसाठी आपण कटीबद्ध असून मंगळवारी प्रभागातील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली तर बुधवारपासून फॉगींग मशीनद्वारे धुरळणी केली जाणार आहे. गंगाराम प्लॉट परीसरात बुधवारी दिवसभरात फवारणी करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत अजय येवले, नंदू चौधरी, नारायण तांबट, सदानंद वराडे उपस्थित होते.

वर्षभरापूर्वीदेखील दिली होती नागरीकांना खंबीर साथ

गतवर्षी कोरोना संकट कोसळल्यानंतर धांडे दाम्पत्याने प्रभागातील नागरीकांना धीर देत आपणंही समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेतून संपूर्ण प्रभागात औषध फवारणीनंतर गरजू असलेल्या नागरीकांना आठवडाभर पुरेल इतक्या भाजीपाल्याचे तसेच नंतर जीवनावश्यक वस्तूंचे देखील वाटप केल्याने प्रभागातील नागरीकांप्रती जागृक असलेल्या धांडे दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचे नागरीकांनी तोंडभरून कौतुक केले होते.

नागरीकांना दिला धीर : घरातच थांबण्याचे केले आवाहन

कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने नागरीकांनी अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे तसेच घरातच थांबावे, असे आवाहन प्रभागातील नागरीकांना नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी केले आहे. प्रभागातील नागरीकांना अत्यावश्यक मदत लागल्यास 9823103155 या क्रमांक संपर्क साधण्याचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.