अति भयंकर ; देशात 24 तासांत आजवरची विक्रमी रुग्ण वाढ ; मृताचा आकडाही वाढताच

0

नवी दिल्ली : भारतात गेल्या काही दिवसांपासून करोनाने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. देशात गेल्या 24 तासांत सापडलेल्या रुग्णांमध्ये आजवरची विक्रमी वाढ झाली आहे. तसेच मृतांचा आकडाही साडेतीन हजाराच्या वर गेल्याने कोरोना लाट विक्राळ रुप  घेत असल्याचे दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 17,68,190 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचा एकूण आकडा 28,44,71,979 झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होतेय आज जवळपास यामध्ये 18 हजारांहून अधिक वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे.

देशात मृतांचा एकूण आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878  रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे.

18 ते 25 एप्रिलमध्ये देशात 22 लाख नवे रुग्ण

देशात 18 ते 25 एप्रिल या काळात 22 लाख 49 हजार नवे रुग्ण वाढले तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या 28 लाखांहून अधिक झाली. तसेच या कालावधीत कोरोनामुळे 16 हजार जणांचा बळी गेला आहे. या आठवड्यात देशात इतके रुग्ण वाढले की तो विश्वविक्रमच झाला. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर मात्र अद्यापही 1.13 टक्के इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 82,6 टक्के आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.