भुसावळात नायब तहसीलदारांना शिवीगाळ ; दोघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ (प्रतिनिधी) : पुरवठा विभागातील 12 अंकी क्रमांक मिळत नसल्याने दोघांनी भुसावळ तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार एस.जे.इंगळे यांना शिवीगाळ करीत अरेरावीची भाषा वापरल्याचा प्रकार बुधवारी दुपारी चार वाजता घडला.

या प्रकरणी इंगळे यांच्या तक्रारीवरून पप्पू सुरळकर व लक्ष्मण जाधव यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उभयंतांनी संजय गाधी योजना कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार एस.जे.इंगळे यांना पुरवठा विभागातील 12 अंकी क्रमांक मिळत नसल्याने वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पोलिस ठाण्यात प्रसंगी महसूल विभागातील नायब तहसीलदार संजय तायडे, योगेश मुस्कावाड, बी.एन.शिरसाठ, सुदाम नागरे, जितेश चौधरी, रविंद्र धांडे, अमोल पाटील, रमाकांत सपकाळे आदी कर्मचारी पोलिस ठाण्यात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.