भुसावळात कॉग्रेस कमिटीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

0

भुसावळ | प्रतिनिधी 

भुसावळ कॉग्रेस कमिटीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले .

यावेळी भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास खरात यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार टाकुन अभिवादन केले.

यावेळी शहर अध्यक्ष रविंद्र निकम जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मो. मुन्वर खान यांनी मार्गदर्शन केले . सर्व पदाधिकारी व कार्यकतै यांनी रघुपती राघव राजाराम पतितपावन सिताराम हे भजन गावुन महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. महिला कॉग्रेस पदाधिकारी, यास्मिन बी, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलिम गवळी, प्रदेश संयोजक भगवान मेढे यांनी श्रध्दांजली व्यक्त केली याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष जे. बी कोटेचा, सरचिटणीस शैलेश अहिरे, शहर उपाध्यक्ष शैलेंद्र नन्नवरे, सागर कुरेशी, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, शेख हमिद सर, रविंद्र साळवे, जिल्हा महिला सचिव राणी ताई खरात जिल्हा उपाध्यक्ष हमिदाबाईची गवळी, यास्मिन बी, सलिम पटेल सुरेश थेटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.