भुसावळातील महाराष्ट्र रनर्सला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा फटका

भुसावळ | प्रतिनिधी 

भुसावळातील राज्यस्तरीय रनर्स तसेच भुसावळ शहरातील अलायन्स मराठी चर्चचे कार्यशील सभासद डॅनिएल सुरेश पवार उर्फ बॉबी पवार यांना नाहाटा चौफुलीजवळ राज्य राखीव दलासह स्थानिक पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याने त्यांचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. २४ रोजी सायंकाळी बॉबी पवार हे वाघूर धरणावरून परतत असताना नाहाटा चौफुलीजवळ जमावबंदीचे उल्लंघण केल्याने उभय पोलिसांनी कुठलीही सबब ऐकून न घेता मारहाण केल्याचा आरोप आहे.घरातील एकमेव कर्ता व्यक्ती असलेला बॉबी पवार यांना झालेल्या मारहाणीचा ख्रिस्ती समाजातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पवार यांनी नियमांचे उल्लंघण केले असलेतरी हात-पाय तुटेपर्यंत करण्यात आलेली मारहाण निश्‍चितच समर्थनीय नाही, असा देखील समाजबांधवांचा सूर  आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पवार हे सकाळी घराबाहेर पडले व सायंकाळी आल्यानंतर नाहाटा चौफुलीजवळ कुठलीही विचारपूस न करता पाच ते सहा जणांनी बळाचा प्रयोग करून त्यांच्या हाता-पायांवर काठ्या म

Comments are closed.