भींत कोसळून महिलेचा मृत्यू ; निकृष्ट दर्जाच्या घरकुल बांधकामाने घेतला महिलेचा बळी

0

 धानोरा (प्रतिनीधी) :: चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे निकृष्ट दर्जाचे घरकुल बांधकामाची भींत कोसळल्याने आदिवासी महिलेचा अक्षरशः मेंदूच रस्त्यावर फेकला गेल्याने आक्रोशाचा आवाज गावभर घुमल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. या दूरदैवी घटनेत एक महिला ठार झाली असून तीन महिलांना गंभीर जखमी झालेने जळगावला हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गावातील एका आजारी महिलेचा अंत्यसंस्कार आटोपून घरी आल्यावर भिकन पावरा यांच्या घरी ओट्यावर पाणी पिण्यासाठी बसलेल्या असतांना निकृष्ट दर्जाची घरकुल बांधकामाची भींत अचानक कोसळल्याने रेशमाबाई परशुराम पावरा (वय 30) ही जागीच ठार झाली तर कालूबाई प्रताप पावरा, भाकलाबाई पावरा, कूसूमबाई पावरा ह्या गंभीर जखमी झालेल्या आहेत. तिघींना जळगाव गोदावरी हाँस्पिटलला हलविण्यात आले आहे.

घटनास्थळी सरपंच भूषण पाटील, सदस्य रवि पाटील, शरद पाटील, जबरा तडवी, आधार बारेला व गावकऱ्यांनी धाव घेऊन सदरील महिलांना बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावली. अडावद पोलीसांनी घटनास्थळी पोहोचत पुढील तपास करीत आहेत बीडिओ डोळे झाक करित असल्याने तालुक्यात घरकुल बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहेत. त्यामुळेच असले प्रकार होत असल्याची चर्चा गावभर होती.

Leave A Reply

Your email address will not be published.