आर्थिक उन्नतीसाठी शेतीसोबत पशुपालनासाठी आग्रही रहा – खा.उन्मेश पाटील यांचे प्रतिपादन

0

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) शेती करत असताना जोड धंदा म्हणून शेळीपालन व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी डोळसपणे बघितले पाहिजे.विविध प्रजातीच्या माध्यमातून वर्षभरात दोनदा उत्पन्न देणाऱ्या शेळी पशुपालनाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा होणार असल्याने शेतकरी बांधवांनी शेळी पशुपालन या जोडधंद्यासाठी आग्रही रहावे.असे आवाहन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे.

बिलाखेड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी पालन विकास महामंडळाच्या वतीने भऊर येथील श्रीमती हिरकणबाई जाधव,सुभाष वराडे (हिरापूर), आनंदा जाधव (वाघले), राजेंद्र जगताप (भोरस), अनिल मोरे (भऊर) यांना या शेळ्यांचे  वाटप खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस के.बी.दादा साळुंखे, माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील,माजी सदस्य दिनेश बोरसे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रकाका जैन, प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ. प्रियंका तोडे, सहा. व्यवस्थापक श्री सुनील नेरकर, पशूविकास अधिकारी डॉ. एम बी. मंदिगुडे, सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक अ.वी.दादा कर्पे, सर्वेश पिंगळे, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.प्रियंका तोडे, यांनी प्रास्ताविकात पशु शेळी पालन व्यवसायासाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम असून या प्रशिक्षणातून शेतीसोबत जोड धंदा म्हणून पशु पालन केल्यास आर्थिक उन्नतीस मदत होणार आहे.असे सांगून त्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सुरवातीला डॉ.तोडे यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांचा स्वागत व सत्कार केला. खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याने जास्तीत जास्त संख्येने गटांची स्थापना करा.या योजनेचा लाभ घ्यावा.असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.