भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय टेली कोलँबोरेशन प्रोजेक्टमध्ये बी एन पाटील यांचा सहभाग

0

भातखंडे प्रतिनिधी : भारत आणि बांगलादेश आयोजित इको ट्रेनिंग सेंटर स्वीडन व नाशिक जिल्हा शिक्षक प्रशिक्षण  संस्था जिल्हा परिषद जळगाव  महाराष्ट्र गव्हर्मेंट  एलिमेंट्री टीचर्स फ्रॉम बांगलादेश गव्हर्मेंट, स्वयंसेवी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भारत व बांगलादेश  या देशातील  निवडक इंग्रजी शिक्षकांना टेली कोलँबोरेशन  प्रोग्राम मध्ये कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ इंग्रजी विषयाचे शिक्षक बी एन पाटील यांनी या निवडक शिक्षकांमध्ये सहभाग नोंदवला असून ते बांगलादेशातील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका इस्मत फरजाना यांच्यासमवेत  हा प्रकल्प  राबवत असून ते त्यांना उत्तम प्रकारे  माहिती देत आहे.

आणि त्याच पद्धतीने हे देखील माहिती देत आहे प्रकल्पात बांगलादेश आणि भारत यातील वरील सर्व नमूद केलेल्या बाबी ते जाणून अभ्यास करत आहेत. १५ सेशनचा  प्रोजेक्ट दोघां देशातील इंग्रजी विषयाचे शिक्षकां मिळून राबविला जात आहे. या प्रकल्पात चर्चा पद्धतीतून सादरीकरण करायचे आहे प्रथमता प्री रजिस्ट्रेशन ,प्री अवेअरनेस टेस्ट, कुटुंब परिचय प्रकल्पाचा उद्देश, फेवरेट टाईम पास, तेथील दारिद्र्य, त्या प्रदेशातील अन्न, झिरो भुकेले, तेथील संस्कृती, चांगल्या आरोग्य, विषयी काय केले जात आहे, तेथील प्रदेशातील रहिवाशांचे जीवन कशी आहे, गुणवत्ता शिक्षण कसे आहे.

तेथील प्राणी कोणते, गुणवत्ता शिक्षण कसे आहे, तेथील प्रांतरचना, तेथील सण-उत्सव, तेथील सोशल मीडिया, जेंडर इक्वलिटी विषयी, तेथील ऋतुमान कसे आहेत, स्वच्छ पाणी आणि आरोग्य विषयी, तेथील सुट्ट्या व भेट देण्याची पद्धत,या साऱ्या गोष्टींचा  गोषवारा पूर्ण पंधरा सेशनचे मूल्यमापन अशा पद्धतीने भारत आणि बांगलादेशचे शिक्षक इंग्रजी विषयाचे शिक्षक यांच्यात आंतरराष्ट्रीय टेली कोलॅबोरेशन प्रोजेक्ट  45 मिनिटे  भारताचे इंग्रजीचे शिक्षकाला  तसेच 45 मिनिटे बांगलादेशच्या शिक्षकाला अशाच प्रकारचे प्रश्न एकमेकांना विचारून दोन्ही देशांमधील वरील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्यात सातत्य विकासाचे लक्ष आहे.

सदरचा प्रकल्प नाशिक जिल्ह्याचे डायचे अधिव्याख्याता योगेश सोनवणे साहेब तसेच जळगाव जिल्ह्याचे इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ हे परिश्रम घेत आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय टेली कॉलाबोरेशन प्रोजेक्टमध्ये सहभागाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, संस्थेचे संचालक तथा अवर सचिव मंत्रालय प्रशांत विनायकराव पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. पुनमताई प्रशांत पाटील शाळेचे मुख्याध्यापक आर एस पाटील सह तालुक्यातील सर्व इंग्रजी विषयाचे शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.