आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये

0

चिखली(प्रशांत ढोरे पाटील) : – बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना काळात डॉक्टर रुघ्नांना आहाराविषयी जो सल्ला देत असतात त्याच प्रमाणे रुघ्नांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून ही वेळ उपास तापास करण्याची नसून प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने मांसाहार करण्यास हरकत नसल्याचे मत प्रसारमाध्यमाद्वारे व्यक्त केल्याने त्यांच्या वक्तव्याचा झालेला विपर्यास थांबवावा असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांद्वारे आमदार गायकवाड व वारकरी बांधव यांच्यात एकमेकांविरोधात आरोप प्रत्याआरोप होतांना आपण बघत आहोत,प्रखर हिंदुत्ववादी म्हणून सँम्पूर्ण महाराष्ट्र भर ओळख असलेल्या आमदार गायकवाड यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत वारकरी संप्रदायाच्या काही व्यक्तींना दिलेल्या उत्तराचा विपर्यास होतांना दिसत आहे.

आमदार महोदयांच आहारा विषयी जे वादग्रस्त वक्त्यव्य प्रसारित झालं त्यात त्यांच्या कुणाच्या ही भावना दुखावण्याचा उद्देश नसावा त्यांच्या म्हणण्यानुसार आजरोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मांसाहार हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरत असल्याने जुन्या चालीरीती व काही अनिष्ट रूढी परंपरा जोपासत जे अघोरी उपास तापास आपल्या समाजात केले जातात त्याला काही अंशी किमान कोरोना काळात तरी सद्सद विवेक बुद्धीचा वापर करून पूर्वी प्रमाणे दही, दूध ,तूप नैसर्गिकरित्या पिकवलेले फळे, पालेभाज्या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार योग्य तो आहार घेऊन आरोग्याची काळजी  घ्यावी व जे शुद्ध शाकाहारी असतील त्यांनी दूध, तूप, पालेभाज्या, फळे यांचा सकस आहार घ्यावा असे प्रशांत पाटील  म्हटले आहेत.

आमदार गायकवाड व काही वारकरी मंडळी यांच्यात गैरसमज होऊन  आरोप प्रताआरोप झाल्याने ज्या वारकरी संप्रदायांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांनी भावनेच्या आहारी न जाता जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आमदार महोदयांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास न करता कोरोना काळात जो काही मांसाहार व्यतिरिक्त ही सकस शाकाहारी आहार घेता येईल याविषयी जनजागृती करावी व  एकमेकांच्या आरोप प्रत्यारोप न करता शासनाला प्रशासनाला सहकार्य करावे व आरोग्याविषयी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आमदार संजय गायकवाड यांनी आहाराविषयी आपले मत व्यक्त केल्याने त्यांच्या वक्त्यव्याचा विपर्यास करू नये असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.