भारत-चीन सीमेवर गोळीबार, ३ भारतीय जवान शहीद

0

लडाख । भारत आणि चीन यांच्यातील तणाव संपुष्ठात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. मात्र या गोष्टीला पुन्हा एकदा चीनकडून तडा देण्यात आला असल्याचे समोर आले आहे. कारण दोन्ही देशांच्या सीमेवर चीनकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एक भारतीय अधिकारी व २ जवान शहीद झाले वृत्त समोर येत आहे. भारत सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार,  भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात सैनिकांच्या माघार दरम्यान ही घटना घडली. भारतीय लष्कराचे म्हणणे आहे की, सोमवारी रात्री भारत-चीन सीमेवर असलेल्या लवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यात जोरदार संघर्ष सुरू झाला, ज्यामध्ये एक सैन्य अधिकारी आणि दोन सैनिकांचा मृत्यू झाला.

भारतीय लष्कराच्या मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, चिनी सैन्यालाही मोठं नुकसान सहन कराव लागलं आहे. मात्र, अद्यापपर्यंत किती चिनी सैनिक मरण पावले आहेत किंवा जखमी झाले आहेत याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

लष्कराच्या मुख्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांचे वरिष्ठ सैन्य अधिकारी या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी सध्या घटनास्थळी बैठक करत आहेत. गलवान खोरं हा भारत चीनच्या लडाख सीमेवरील प्रदेश आहे. अलीकडे या भागात चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.