कनाशी-देव्हारी येथे माऊली फाऊंडेशनच्यावतीने मास्क वाटप

0

कजगाव (प्रतिनीधी) : माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने भडगाव शहर व भडगाव मधील गावांमध्ये मास्क वाटण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माऊली फाऊंडेशनच्या वतीने गोंडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी कनाशी-देव्हारी येथे लसीकरण कार्यक्रमाच्या वेळी लसीकरणास येणाऱ्या सर्व मातांना मास्क वाटप केले. याबाबतीत अधिक माहीती देतांना सोनार यांनी सांगितले की मी माऊली फाऊंडेशनचा स्वंयसेवक असल्यामुळे माझ्या कडेही मास्क वाटण्याची जबाबदारी दिली आहे.माऊली फाऊंडेशन भडगाव येथील सामाजिक संस्था असुन कोरोनाच्या काळात माऊली फाऊंडेशनने केलेले कार्य वाखणण्याजोगे आहे.

माऊलीफाऊंडेशनने सुरुवातीला एक हात मदतीचा ह्या उपक्रमा अंतर्गत भडगाव येथे शेकडो गरजु कुटुंबांना किराणा वाटप केले. त्यानंतर भडगाव शहर व गावांमध्ये आर्सेनिक अल्बम-30 ह्या गोळ्यांचे वाटप केलेले आहे. ह्या गोळ्यांचे वाटप भडगाव तालुका आरोग्य विभागालाही केलेले आहे.माऊली फाऊंडेशनच्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर प्रसंगी कनाशी येथील आरोग्य सेविका सुरेखा गढरी, आशास्वयंसेविका योगिता कुमावत, मदतनीस मंगला पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.