भारतीय टपाल विभागात दहावी पास उमेदवारांसाठी मेगा भरती, परीक्षेविना होणार नियुक्ती

0

जर तुम्ही चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागात आपल्यासाठी बंपर जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे.

टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांवरील रिक्त जागे भरती प्रक्रिया सुरु केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. यामुळे आपल्याकडे केंद्र सरकारमध्ये सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. टपाल खात्याने अधिसूचना जारी करून भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी पोस्ट विभागाने 1137 भरती काढली आहे. त्यासाठी केवळ ऑनलाईन अर्ज घेतले जातील. ग्रामीण डाक सेवक पदासाठी पगाराची मर्यादा 10,000 ते 12,000 रुपये असेल. याशिवाय केंद्र सरकारचे इतर भत्तेही मिळतील.

पात्रता :आपल्याकडे देशातील कोणत्याही शिक्षण मंडळाचे दहावी उत्तीर्ण मार्कशीट असावे. दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. दहावीत गणित, इंग्रजी आणि स्थानिक भाषा असणे महत्वाचे आहे. विशेषत: स्थानिक भाषा 10 वी पर्यंत असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. यासाठी कोणत्याही शासकीय किंवा खासगी संस्थांकडून किमान 60 दिवस संगणक प्रशिक्षण कोर्स असणे बंधनकारक आहे.

वय मर्यादा

टपाल खात्यात या रिक्त जागांसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. ही भरती छत्तीसगड पोस्टल सर्कलमध्ये केली जाईल.

असा करा अर्ज

भारतीय टपाल विभागाची अधिकृत वेबसाईट appost.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी 8 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2021 आहे. भरतीसंदर्भात सर्व माहिती आणि ऑनलाईन अॅप्लिकेशनची लिंक अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.

अर्जाची फी

सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पुरुष उमेदवारांना अर्जासाठी 100 रुपये फी भरावी लागेल. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.