भारतीय जनता युवा मोर्चा कॉटन मार्केट मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

0

अमरावती, प्रतिनिधी (रामचंद्र मुंदाने)

सध्या सर्वत्र कोरोना  महामारीचे थैमान सुरू असल्याने रक्त साठा कमी पडू नये म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा कॉटन मार्केट मंडळातर्फे सरचिटणीस सागर महल्ले, अध्यक्ष दर्शन भुयार यांच्या वाढदिवसानिमित्त  महेंद्र कॉलनी येथील पांढरी हनुमान मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले.  शिबिरात एकूण वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपाचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, संघटन महामंत्री गजानन  देशमुख, कौशिक अग्रवाल मंडळ अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष सतीश करेशिया, नगरसेविका सोनालीताई करेशिया, नगरसेविका माधुरी ठाकरे,  नगरसेविका सुनीता  राऊत, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणित सोनी व भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच भारतीय जनता युवा मोर्चा कॉटन मार्केट मंडळाचे कार्यकर्ते तेजस वानखडे, राम गुप्ता, प्रणव माहुरे, करण टोकमोरके, संतोष शिंदे, प्रज्वल वरुडकर, राजेश चौधरी, धिरज लोणारे, विनय वैद्य, नैतिक बासठीक, रितिक दळवी, अनिकेत पटेल, अभिषेक अब्रू, युवराज पवार, तीलक गुप्ता, अमन इंगळे आदि कार्यकर्ते हजर होते.  या रक्तदान शिबिरात पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय ब्लड बँकेचे डॉक्टर सचिन काकडे व चमुनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.