भारतासह अनेक देशांत YouTube डाऊन

0

नवी दिल्ली. जगातील सर्वात मोठी व्हिडिओ स्ट्रिमिंग वेबसाइट YouTube, आज, १९ मे रोजी सकाळी डाऊन झाली आणि युट्युबर्सचा एकच गोंधळ उडाला. . सुमारे तासभर थांबल्यानंतर यूट्यूबवर काम करण्यास सुरवात केली. सेवा थांबली असल्याची पुष्टी नंतर ट्वीटद्वारे यूट्यूबनेही केली.

यूट्यूब डाऊन झाल्यानंतर #YouTubeDOWN ने ट्विटरवर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. युजर्सना युट्यूबच्या App आणि डेस्कटॉप आवृत्त्या या दोन्हीवर अडचण येत होती. युजर्स व्हिडिओ पाहू शकत नव्हते तसेच त्यांना लॉग इन देखील करता येत नव्हते. डाऊन डिटेक्टरने देखील यूट्यूब Down असल्याची पुष्टी केली.

सकाळी ८ वाजता सुमारे ८९ जणांनी युट्यूब डाऊन डिटेक्टर Down असल्याची तक्रार केली होती आणि सकाळी ८. ३० पर्यंत तक्रारदारांची संख्या ८ हजाराहून अधिक झाली होती. व्हिडिओ प्ले होत नसल्याची तक्रार ९० % लोकांनी केली . त्याच वेळी, २ टक्के लोकांना लॉग इन करण्यात समस्या होती.

Leave A Reply

Your email address will not be published.