भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा- अमित शाह

0

नवी दिल्ली :- भारतीय वायुदलाने २६ फेब्रुवारी रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधील बालकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात किती दहशवादी मारले गेले याची अधिकृत आकडेवारी आलेली नाही. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा केला आहे. रविवारी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

उरी हल्ल्यानंतर लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक असल्याने सर्जिकल स्ट्राइक होणार नाही असे लोक म्हणत होते. पण नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाने तेराव्या दिवशीच एअर स्ट्राईक झाला. यामध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला असे शाह म्हणाले. तसेच विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या हाती लागल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारचा प्रभाव इतका होता की, ४८ तासांच्या आत त्यांची सुटका करावी लागली. इतक्या कमी वेळात सुटका होण्याची जगातील ही पहिली घटना होती असे अमित शाह म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.