निपाणे, ता. एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या भातखेडे येथे एक ६३ वर्षा वरील पुरुष कोरोना संशयीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना देखील कोरन टाईन मध्ये ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गल्ली तील काही भाग पत्रे लावून बंदीस्त करण्यात आले आहेत. तसेच कोणीही काम असेल तरच घरा बाहेर निघावे बाहेर निघतांना शासनाने लावून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. जसे तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुणे, सॅनिटायझर चा उपयोग करणे आदी बाबींचे पालन करणे आवश्यक सांगितले आहे. या पाश्र्वभूमीवर भातखेडे ग्राम पंचायत प्रशासन कडून खबर दारीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत.