पिंप्रीत उद्यापासून ३ दिवस जनता कर्फ्यू

0

पिंप्री खुर्द, ता. धरणगाव (वार्ताहर) :- तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंप्री खुर्द गावात उद्या दिनांक ७ जूलै मंगळवार ते दिनांक ९ जूलै गुरुवार पर्यंत तीन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायतच्या कोरोना नियंत्रण समीती, व्यवसाईक बांधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वयंपूर्तीने हा बंदच्या निर्णय घेण्यात आला आहे.

या बंद काळात गावातील फक्त किराणा दुकान, मेडिकल व कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु राहतील. तसेच दुध डेअरी सकाळी व संध्याकाळी ७ ते ९ पंर्यतच सुरू राहिल . या व्यतरिक्त सर्वच व्यावसाईक दुकाने उदया दिनांक ७जूलै पासून तीन दिवस कडकडीत बंद राहतील. या काळात वरील व्यतिरिक्त ज्या व्यवसाईकांची दुकाने उघडी आढळल्यास त्यांच्यावर प्रशासना तर्फ कलम १८८ अन्वये कारवाई व गुन्हें दाखल करण्यात येणार आहे.

मंगळवारी गाव बंद
मंगळवार हा बाजाराच्या दिवस असतो. शासनाच्या आदेशान्वेय बाजार बंद असुन त्या दिवशी गावात बाहेरून येणारे व्यवसाईक व परिसरातील सर्वच गावातील खरेदी करणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ होते . हि बाब लक्षात घेता दर मंगळवारी गावातील सर्वच दुकाने ३० जुलै पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

तरी ग्रामस्थांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नये. प्रत्येकाने तोंडाला मास्क किवा रुमाल बांधणे सक्तीचे आहे. विना मास कुणी आढळल्यास त्याना दंड करण्यात येणार आहे. तरी आपल्या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हितासाठी सर्वानी या तीन दिवसीय जनता कर्फ्यूस व दर मंगळवारी गाव बंद यास सहकार्य करावे , असे आवाहन ग्रामपंचायतच्या कोराना नियंत्रण समिती, व्यापारी ,व्यवसाईक बांधव व ग्रामस्थांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.