भातखंडे विद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी स्पर्धा घेऊन केली साजरी

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रसंत ग्रामस्वच्छतेचा संदेश गावोगावी देणारे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी  कोरोणा महामारीचा काळ असल्याने विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारे” संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर  त्यांचा जीवनपट” व कोरोणा काळातील “ग्रामस्वच्छता व गृह स्वच्छतेचे महत्त्व” यावर स्पर्धा आयोजित करून विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात  ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून सहभागी विद्यार्थ्यांना देखील बक्षिसांचे वाटप  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात उपयोगी पडेल अशा भेटवस्तू या सर्व विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.

स्पर्धेतून पहिले’ दुसरे’ तिसरे’   विद्यार्थी  निवडले जाणार आहेत. प्रसंगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील सहशिक्षक आय जे पाटील,एन यू देसले ,बी एन पाटील, एस बी भोसले ,आर यु राऊळ ,एस एन सोनवणे, ए एस पाटील,एस जे सैदाणे, संदीप पाटील, शिक्षकेतर कर्मचारी नित्यानंद पाटील, संजय पाटील  सोपान पाटील सह शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी प्रतिमा पूजन केले. संत गाडगेबाबा पुण्यतिथी व स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.