जळगाव : सोने चांदीच्या दरात अचानक मोठी वाढ, जाणून घ्या आजचा नवा दर

0

जळगाव : सोन्या चांदीच्याच्या दरात पुन्हा एकदा अचानक मोठी वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोने प्रती 10 ग्रॅम 50 हजाराच्या खाली होते. मात्र स्थानिक वायदा बाजारात (एमसीएक्स) सोमवारी सोन्याच्या भावात 652 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एमसीएक्सवर सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 50,956 रुपयांवर ट्रेंड करत आहेत.

 

दरम्यान कोल्हापुरात सोन्याचे भाव 51,100 प्रतितोळा आहेत. तर जळगावात शनिवार पर्यंत 51 हजाराचा असलेला सोन्याचा भाव आज सोमवारी 51,763 प्रतितोळा आहे. जवळपास 700 ते 750 रुपयांची वाढ अचानक झाली.

तर चांदी शनिवार पर्यंत 67500 प्रति किलोचा असलेला भाव आज सोमवारी 70000 पर्यंत पोहचला. एका दिवसात 3000 रुपये प्रतिकिलो ने अचानक वाढ झाली आहे.

शेअर सेन्सेक्स अचानक कोसळला त्यामुळे सोने चांदी वधारले आहे असे निष्णात सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.