भातखंडे येथील मामा – भाचा गिरणेच्या प्रवाहात बेपत्ता

0

पाचोरा (प्रतिनिधी) : भातखंडे ता. पाचोरा येथील गिरणा नदी पात्रात मामा – भाचे मासेमारी करीत असतांना भाच्याचा पाय घसरुन नदी पात्रात पडला हे मामाच्या लक्षात आल्याने भाच्यास वाचविण्यासाठी गेलेल्या मामाही पाण्यात वाहुन गेल्याची घटना दि. 2 रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान घडली असुन दोघांना शोधण्याची मोहीम गेल्या पाच तासांपासून सुरू आहे. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती. मात्र शोध मोहिमे सोबत पाचोरा पोलिस ठाण्याचे काॅन्स्टेबल प्रकाश पाटील व श्याम पाटील घटनास्थळी ठाण मांडून आहेत.

पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथे ह्यदय हालवुन टाकणारी घटना घडली असुन दि. २ रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान घरी लागणारी भाजी बनविण्यासाठी मासे लागणार असल्याने जगदिश जगन्नाथ नाईक, सोनवणे (मामा) वय – 38 व त्यांचा अविवाहित भाचा सागर मंगलदास ठाकरे वय – 23 वर्ष हे दोघे मामा – भाचे गिरणा नदी पात्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. गिरणा धरण ओव्हर फ्लो होवुन वाहत असल्याने धरणाचे पाणी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणेला मोठा पुर सुरू आहे. दरम्यान भाचा सागर याच्या मासेमारी करीत असतांना त्याचा पाय घसरुन पाण्यात पडला भाच्यास वाचविण्यासाठी मामा जगदिश जगन्नाथ नाईक यांनीही पाण्यात उडी मारली. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघेही मामा – भाचे पुरात वाहत होते. हे गिरणा नदी पात्रा जवळच भिल्ल वस्ती असल्याने मामाचा 10 वर्षाच्या मुलाने आरडाओरड सुरू केली. यामुळे येथील निंबा पंडित पाटील, राजेंद्र विठ्ठल पाटील, रमेश धनराज पाटील, दत्तु विठ्ठल कुमावत, तुकाराम शांताराम पाटील या गावातील पोहणाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या परंतु मामा – भाचा हे सापडले नाहीत. विशेष म्हणजे जगदिश नाईक व सागर ठाकरे हे दोघेही पट्टीचे पोहणारे होते. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने ते स्वत:ला वाचवु शकले नाही. सायंकाळी अंधार पडल्याने शोध पथकास मामा – भाच्यास शोधण्यास अडचण निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत गावातील लोकांचा मोठा जमाव नदीकाठी जमला होता. जगदिश नाईक यांचे पाश्र्चात्य वृद्ध आई, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार असुन सागर ठाकरे याचे लहाणपणापासूनच निघुन गेले असुन तो वृद्ध आईस एकमेव सहारा होता.

Leave A Reply

Your email address will not be published.