भातखंडे परिसरात मान्सून पूर्व मशागतीच्या कामास सुरुवात

0

भातखंडे (प्रतिनिधी) : भातखंडे सह उत्राण तळई गिरड भातखंडे सह परिसरात शेतकऱ्यांची मान्सून पूर्व मशागतीला जोरदार सुरुवात झालेली असून मान्सून सुरू होण्या अगोदरच आकाशात ढग गोळा व्हायला लागलेली आहेत. तसेच वातावरणात पावसाळ्या सारखं वातावरण तयार झालेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती कामासाठी मोठ्या प्रमाणात लगबग सुरू होताना दिसत आहे. यासाठी शेतकरी ट्रॅकक्‍टरच्या साह्याने शेती करण्यासाठी अधिक मदत घेत असून कापसाचे क्षेत्र तयार करण्यासाठी ट्रॅक्टर रोटावेटरच्या साह्याने शेती तयार करीत आहे.

शेतामध्ये अजून देखील सूर्यफूल, बाजरी ,मका, भुईमूग, ही पिके अजून शेतातच असून शेत तयार करणे पीक काढणे, आलेले पीक शेतातून घरी घेऊन जाणे यासाठी शेतकऱ्याला खूप खूप प्रचंड मेहनत करावी लागत आहे .त्यासाठी शेतकऱ्याला मजुरांचा प्रश्न देखील भेडसावत आहे तसेच जे पीक काढले गेले आहे. त्यात खासकरून मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, कपाशी या पिकांना देखील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी देखील कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन असल्याने केव्हा बाजार समित्या चालू असतात तर केव्हा बंद होतात यामुळे शेतकऱ्याचा माल देखील विकला जात नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा अस्वस्थ झालेला आहे शेती तयार करण्यासाठी डोक्यावर दिवस आले असून ऐन अडचणीच्या काळात शेतकऱ्याला शेती तयार करण्यासाठी माल विकण्याशिवाय पर्याय नाही माल विकेल तेव्हाच त्याला पैसा मिळेल पैसा मिळेल तेव्हा त्याला चांगली शेती करता येईल तेव्हाच शेतकऱ्याला चांगले बी-बियाणे घेता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फरपट होताना दिसते आहे. कापसाचे तर मोठ्या प्रमाणात अतोनात हाल होत आहे.

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत आत्तापर्यंत सात हजार शेतकऱ्यांना टोकन दिल्याचे समजते .यात शेतकऱ्याचा नंबर जिनिंग मध्ये केव्हा लागेल तो कापूस केव्हा विकेल विकलेल्या कापसाचे पैसे त्याच्या बँक अकाउंट वर केव्हा जमा होतील हे अनेक प्रश्नचिन्ह आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसत आहे कापूस प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने हा विषय घ्यावा बाजार समितीत कापूस विकण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांन पेक्षा कापसाच्या व्यापाऱ्यांचा बोलबाला या ठिकाणी जास्त असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांपेक्षा व्यापारांचा नंबर अगोदर लावला जातो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी याबाबत शासनाने दखल घ्यावी आणि बळी राजांच्या या समस्या दूर कराव्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.