भातखंडे खु. गावातील कोरोना समीतीचे गावाकडे दुर्लक्ष?

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या ता पाचोरा भातखंडे खुर्द, आणि नवेगावात आठवड्याभरात कोरोना हॉटस्पॉट झोन , मुंबई,नाशिक,सुरत,इत्यादी ठिकाण्यावरूण गावातील जे नागरीक पोटभरण्या करीता गेले होते. आता ते नागरीक आपल्या मूळ गावात आले आहे.ते जरी कोरोनाची तपासणी करून जरी आले असतील,तरी प्रशासनाने गावातील नागरीकांचा हितासाठी. ह्या बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना जिल्हा परिषद मराठी शाळेत १४ दिवस क्वांरटाईन करण्याचा आदेश आहे.

स्वतंत्र विलगीकरण करून ठेवावे अथवा घरातल्या घरात होम क्वांरटाईन राहावे. तरी गावात असे चित्र दिसत नसल्याचे समोर येत आहे आलेले काही नागरीक घराबाहेर बिनधास्त पणे चेहऱ्यावर मास्क न वापरता फिरतांना आढळून येतात आणि असले तर गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने ते हानिकारक आहे दुर्दैवाने एखाद्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्यास त्याचे दुष्परिणाम संपूर्ण गावाला भोगावे लागतील यासाठी प्रत्येक गावात जिल्हाधिकारी यांनी कोरोना समितीची स्थापन केलेली आहे. तरी भातखंडे गावातील कोरोना समिती अजुन गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसत आहे.जर बाहेरगावाहून आलेल्या पैकी कोणालाही कोरोना संसर्ग असल्यास आणी या गावात फिरणाऱ्या लोकांन मार्फत जर गावकरी लोकांना कोरोना संसर्गाची लागण झालीतर यास कोरोना समिती जबाबदार धरू असे भातखंडे गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.तरी कोरोना समितीने गावात आलेल्या बाहेरगावाचा लोकांना गावाचा सुरक्षा म्हणुन जि.प.शाळेत क्वांरटाईन करावे अशी मागणी गावातील ग्रामस्थ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.