भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे,लोकसहभागातून निवडणूक लढेन : चित्रसेन पाटील

0

चाळीसगाव :- महाराष्ट्र विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी तर्फे उत्सुक असलेले उमेदवार  व बेलगंगा कारखाना अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक म्हणून मागणी केलेली आहे. पक्षाने जर मला  उमेदवारी दिली तर माझी लढण्याची इच्छा आहे. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की सध्याच्या निवडणुका ह्या अर्थकरणावर अवलंबून आहेत आणि  आपल्या वर  आधीच  कारखान्याची जबाबदारी असल्याने  आर्थिक दृष्ट्या बाजू कमकुवत आहे.यावर चित्रसेन पाटील म्हणाले ज्याप्रमाणे बेलगंगा साखर कारखाना मी माझ्या सहकाऱ्यांसह लोकसहभागातून चालू करण्यास यशस्वी झालो. त्याचप्रमाणे ही निवडणूक सुद्धा मी लोकसहभागातूनच निवडणूक लढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे  भारतीय जनता पक्षाने जर मला  उमेदवारी दिली नाही, तर मी कुठल्याही ही पक्षात न जाता भारतीय जनता पक्ष ज्या उमेदवारास तिकीट देईल त्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करेल असे आवर्जून सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.