फैजपूर स्टेट बँकचा मनमानी कारभार

0

फैजपूर | प्रतिनिधी 

येथील स्टेट बँक इंडिया शाखेचा गेल्या अनेक दिवसापासून मनमानी कारभार सुरु असून येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानीला जनता  कंटाळली आहे. बँकेत कर्मचारी ग्राहकांना वेढीस धरत आहे. बँकेचे कामकाज कासव गतीने व त्यांच्या मनाप्रमाणे चालते.

दररोज या बँकेत विड्रॉल असो अथवा पैसे भरायचे असो रांगेत तासन-तास ग्राहकांना उभे राहावे लागते. त्यातच पुर्ण ग्राहक न करता मधातच जेवणाची सुट्टी म्हणून सर्व कर्मचारी आतमधल्या थंड हवेच्या रुममध्ये जातात. तासभर निघतच नाही तोपर्यंत ग्राहक कंटाळून बाहेर जातात. कर्मचारी मात्र दुपारीच वेळ न बघता गेटचे कुलूप लावून घेतात. तोपर्यंत बाहेरचा येणारा ग्राहक भरपावसात जनावरांच्या कोंडवाड्यासमोर उभा राहील्यासारखा गेटवर उभा राहतो. मात्र बँकेचे कर्मचारी गेट उघडत नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण भागासह शहरातुन दररोज शेकडो ग्राहक स्टेट बँक शाखेत आर्थीक व्यवहार करण्यासाठी येतात. मात्र या बँकेचे कर्मचारी,  अधिकारी आम्ही जनतेवर उपकारच करीत असल्याचा आव आणतात. कर्मचाऱ्यांच्या अशा मनमानीमुळे ग्राहकात चिड निर्माण होत आहे.

शौचालय लाभार्थींची यादी धूळ खात 

काही वर्षापुर्वी शासनाच्या भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत फैजपूर शहरात हगणदारी मुक्तिसाठी वैयक्तिक स्वच्छालय योजना राबविण्यात आली. या योजने अंतर्गत शहरातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला मात्र, उर्वरित लाभार्थींना अद्याप पर्यंत त्यांच्या खात्यात रक्कम येथील स्टेट बँक इंडिया शाखेच्या मनमानी कारभारामुळे वर्ग करण्यात आली नाही. नगरपरिषदेने बरेच दिवस झाले लाभार्थींची यादी शाखेला पाठवली मात्र, त्यांनी अद्याव पर्यंत शाखेने शौचालय लाभार्थींना त्यांची रक्कम खात्यात वर्ग केली नसून ती यादी बँकेत धूळ खात आहे. त्वरित लाभार्थींना त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात यावी अशी मागणी लाभार्थींनी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.