भाजपचे भगवान गोयल यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीचे जुता मारो आंदोलन

0
जळगाव –  भाजपचे भगवान गोयल नामक यांनी  आजके शिवाजी – नरेंद्र मोदी असे पुस्तक प्रकाशित करुन छपती शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली असल्यामुळे हा छत्रपती शिवरायांचा अपमान असल्याने  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता भाजपचे भगवान गोयल याच्या प्रतिमेवर जुता मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष नामदेवराव चौधरी, जळगांव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख लिलाधर तायडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले, महिला महानगर अध्यक्ष ममता सोनवणे, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, सर चिंटणीस भरत कर्डिले, नगरसेविका अश्विनी देखमुख, पुरुषोत्तम चौधरी, मिलींद सोनवणे, वाल्मिक पाटील, उज्वल पाटील राजेश पाटील, अनिरुध्द जाधव, जुबेर खाटिक, मंगेश वाघ, अविनाश तायडे, आशिक शेख, तन्वीर खाटिक, अल्ताफ सैय्यद, नाशिर भिस्ती, नावेद शेख, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे कि,  भाजपचे भगवान गोयल नामक व्यक्तीने आजके शिवाजी – नरेंद्र मोदी असे पुस्तक प्रकाशित करुन छपती शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली असल्यामुळे  हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमान आहे. महाराजांच्या  पायाच्या नखांची सर सुध्दा कुणाला करता येणार नाही. तसेच हिमालयाच्या उंची पेक्षाही मोठे त्यांचे कर्तृत्व आणि शौर्य आहे. न्यायी आणि सर्व समाजाभिमुख लोक कल्याणकारी रयतेचा राजा म्हणुन ते जगभर पुजले जातात आणि एका मनुवाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे म्हणजे दगडाला हिमालयाची उपमा देण्यासारखे आहे असे  देवकरांनी जुता मारो आंदोलनावेळी सांगितले.तसेच  ह्या पुस्तक प्रकाशनाला भाजपाला छुपा पाठींबा असल्यामुळे ते यावर गप्प आहेत. एरव्ही कोणत्याही विषयांवर आकांड-तांडव करणारे भाजपा नेते छत्रपती शिवरायांचा अपमान झाला असतांना मूग गिळुन गप्प का? याचे उत्तर त्यांनी द्यावे व ह्या पुस्तकाचे प्रकाशन तात्काळ थांबवावे अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाहीत.असे ही यावेळी सांगण्यात आले. व  पुस्तक जर प्रकाशित होवुन बाजारात आले तरी  कुठल्याही पुस्तक स्टॉलवर विक्री करु देणार नाहीत. हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्यांवर शासनाने ताबडतोब गुन्हे दाखल करावा अशी मागणी करून जाहीर निषेध करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.