आजके शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तका वर बंदी घालण्यात यावी

0

राष्ट्रीय काँग्रेस चे तहसीलदार यांना निवेदन

पारोळा– प्रतिनिधी

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशक लेखक  भाजप नेते भगवान देव गोयल यांच्या जाहीर निषेध छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असून आमचे प्रेरणास्थान आहे श्री गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रसिद्ध केली असून ते निंदाजनक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान करणारे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल तर देशाची जनता कदापि सहन करणार नाही या पुस्तकावरून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भारतीय जनता पार्टी व आरएसएसच्या खरा चेहरा देशाच्या जनतेसमोर आला आहे यापूर्वी देखील याच लोकांनी नरेंद्र मोदी यांची तुलना प्रभू रामचंद्र तर कधी शिव-शंभू बरोबर तुलना केलेली आहे भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास देखील शालेय अभ्यासक्रमातून वगळून टाकण्याच्या घाट रचलेला आहे हे कृत्य देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हाणून पडल्याशिवाय राहणार नाही यापूर्वीदेखील याच लोकांनी जेम्स लेन यांना हाताशी धरून राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनामीकारक वृत्त मासिकातून प्रसिद्ध केले होते भारतीय जनता पार्टी व आरएसएस हे देशाच्या महात्म्यांचे कार्य पुसून टाकण्याचे काम करीत असून ज्यांनी इंग्रज राजवटीत इंग्रजांना सहकार्य केले अशा लोकांच्या खोटा इतिहास सांगत आहेत भाजप नेते भगवान देव गोयल यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक काढले असून त्यांच्या व हे पुस्तक भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रसिद्ध झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आरएसएसच्या पारोळा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर निषेध करीत असून भाजप नेते भगवान देव गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी आमची मागणी असून भाजप व आरएसएसच्या जाहीर निषेध.. अश्या आशयाचे निवेदन पारोळा नायब तहसीलदार वजांरी यांना देण्यात आले,

यावेळी  पारोळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पिरन कुमार अनुष्ठान व उपाध्यक्ष संजय पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव भिका महाजन ढोलीचे दत्त युवराज पाटील किरण शालीग्राम पाटील प्रेमराज विजय पाटील नानाभाऊ पाटील दत्तू देवीदास पाटील अपंग सेलचे अध्यक्ष सुरेश दोधू भोई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.