नाचणखेडा येथील महिलेचा विनयभंग

0
पाचोरा  प्रतिनिधी
       नाचणखेडा ता. पाचोरा येथील विधवा महिलाचा गावातीलच इसमाने विनयभंग केला असुन महिलेने पाचोरा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाचणखेडा ता. पाचोरा येथील ३१ वर्षीय महिला ही आपल्या वृद्ध आई व दोन मुलांसह शेतमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. दि. ११ रोजी वृद्ध आई व पिडीत महिला ही गावातील किरणसिंग रुपसिंग पाटील यांचे शेतात कपाशी वेचण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी १:३० वाजता कपाशी वेचत असतांनाच गावातील साहेबराव चिंधा महाले हा इसम महिले जवळ जावुन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करीत १० हजार रुपये दाखवुन महिलेचा विनयभंग करत असतांना महिलेने आरडा – ओरड केल्याने शेजारच्या शेतात ज्वारीला पाणी भरत असलेले किरणसिंग पाटील हे धावत येत असल्याचे साहेबराव पाटील यांनी बघितल्यानंतर त्याने तेथुन पळ काढला. घडलेल्या घटनेनंतर महिला व तिची वृद्ध आई यांना काही सुचेनासे झाले. सदर महिलेने दि. १४ रोजी पाचोरा पोलिस ठाणे गाठले. व साहेबराव चिंधा महाले या़चे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.